Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रिप्टो मार्केटमध्ये 'भूकंप'! १५ लाख कोटींचा चुराडा; 'बिटकॉइन'सह 'इथेरियम' ५% हून अधिक कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 15:54 IST

Crypto Market Crash : शुक्रवारचा दिवस डिजिटल चलन गुंतवणूकदारांसाठी धक्कादायक ठरला. दीर्घकाळापासून चढ-उतार अनुभवत असलेल्या क्रिप्टोकरन्सी मार्केटला अचानक मोठा धक्का बसला.

Crypto Market Crash : शेअर बाजारातील अस्थिरतेचे पडसाद आता 'क्रिप्टो'च्या जगातही उमटू लागले आहेत. शुक्रवारी क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये अचानक आलेल्या विक्रीच्या वादळामुळे जगभरातील गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. अवघ्या २४ तासांच्या आत जागतिक क्रिप्टो मार्केटमध्ये सुमारे १५.६२ लाख कोटी रुपयांचे (सुमारे १८५ अब्ज डॉलर्स) नुकसान झाले. बिटकॉइन आणि इथेरियम सारख्या दिग्गज कॉइन्समध्ये ६ टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मार्केट कॅपमध्ये ५ टक्क्यांची मोठी घटशुक्रवारी सकाळी १०:३० वाजेपर्यंत एकूण जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप ५.४२ टक्क्यांनी घसरून २.८२ ट्रिलियन डॉलर्सवर आले. ही घसरण केवळ ठराविक टोकन्सपुरती मर्यादित नसून, बाजारातील जवळपास सर्वच प्रमुख डिजिटल चलनांना याचा फटका बसला आहे.

बिटकॉइन आणि इथेरियम धडाम

  • बिटकॉइन : मार्केट लीडर असलेल्या बिटकॉइनमध्ये ६ टक्क्यांची घसरण होऊन तो ८२,८३५ डॉलर्सवर आला आहे. गेल्या एका आठवड्यात बिटकॉइन ७ टक्क्यांहून अधिक तुटला आहे.
  • इथेरियम : इथेरियम ६ टक्क्यांहून अधिक घसरून २,७४० डॉलर्सवर पोहोचला आहे.
  • इतर ऑल्टकॉइन्स : बायनेंस कॉइन, रिपल आणि सोलाना यांसारख्या मोठ्या कॉइन्समध्येही २४ तासांत ६ टक्क्यांहून अधिक पडझड झाली आहे.

'केंटन' ठरला अपवाद!

या विदारक परिस्थितीतही 'केंटन' या कॉइनने गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला. संपूर्ण बाजार कोसळत असताना केंटनमध्ये ६ टक्क्यांची तेजी दिसून आली आणि तो ०.१७२२ डॉलर्सवर व्यवहार करत होता. गेल्या महिनाभरात या कॉइनने सुमारे १६ टक्के परतावा दिला आहे.

वाचा - चांदीमध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी की बुडण्याची भीती? जागतिक बँकेने दिला मोठा इशारा

गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरणबाजारात सध्या सुधारणेची चिन्हे दिसत नसल्याने 'फिअर अँड ग्रीड इंडेक्स' ३८ वरून थेट २८ वर घसरला आहे. हे दर्शवते की गुंतवणूकदार आता प्रचंड भीतीखाली असून नवीन गुंतवणूक करण्याऐवजी पैसे काढून घेण्यावर भर देत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Crypto Market Plunges: Billions Lost as Bitcoin, Ethereum Crash

Web Summary : A crypto market crash wiped out billions, with Bitcoin and Ethereum plummeting. The global crypto market cap fell sharply, triggering investor fear. Kenton defied the trend with gains.
टॅग्स :क्रिप्टोकरन्सीगुंतवणूकस्टॉक मार्केटशेअर बाजारबिटकॉइन